माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

तू अशी ये !!!

प्रिये,
तू अशी ये…
श्वासातल, भासातल
तुझ्या माझ्या भानातल
वा-याच गीत हलक
ओठामधे घेऊन ये
जाईतला, जुईतला
गंध माझ्या मनातला
लहरीचा धूंद सुगंध
हसण्यामधे भरून ये
सरीतला, दरीतला
थेंब माझ्या डोळ्यातला
सुखाचा एक आसू
जगण्यामधे पेरून ये

तो मीच असेल...........

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल..!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल..!

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल..!

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल..!

तु होशील का?

मार्ग माझे खुंटलेले
दिशा तु होशील का?

स्पर्श माझे वाळलेले
चेतना तु होशील का?

डॊळे माझे भरुनी आले
फक्त अश्रु तु होशील का?

ह्रिदय माझे थांबलेले
स्पंदने तु तयाची होशील का?

बिंब माझे विस्कटलेले
प्रतिबिंब तु माझे होशील का?

सुर माझे हरवलेले
जिवन गाणे माझे तु गाशील का?

एकटाच आहे मी
मज साथ तु देशील का ?

गुलाब माझा सुकलेला
तरिही सुंगध तु त्याच होशील का?

सांग प्रिये सांग तु होशील का
ह्या वेड्याजिवाला आपलसं करशील का?

आता खरोखरी शब्द माझे संपलेले
म्हणूनी माझी कविता तरी तु होशील का?

आता "संसार" हीच कविता झालीये रे...

मला आठवतात तिच्या सुरुवातीच्या कविता...
प्रेमाने फुललेल्या, आणी प्रत्येक खेपेस
नव्याने ओथंबलेल्या
कधी त्यात ती पुर्ण बुडुन जायची
मागे उरायची ती फक्त एक सालस कविता
काही शब्द उराशी कवटाळुन ती कविता फुलत रहायची
जाई-जुई सारखी...
तिला विषय लागायचाच नाही कोणता...
अगदी पाऊस असो किंवा काळा दगड
ती कशावर देखील तितक्याच सहजतेने लिहीत जायची
शब्द तर जणु गुलामच होते तिचे
ती वळवेन तसे वळत रहायचे आणी
मागे उरायची ती फक्त एक सालस कविता
मग एक दिवस त्या कवियेत्रीला एक गीतकार मिळाला
तिच्या शब्दांना नव्याने अर्थ येउ लागला
अता तिवी कविता फक्त सालस राहिली नव्हती
त्या कवितेला मंजुळ पंख फुटले होते
तिची कविता नाचु लागली होती, बागडु लागली होती
अखेर व्हायच तेच झालं
लग्न नावाचा साक्षात्कार...

आता प्रकरण गंभीर आहे
तिला कविता तर सुचतात, पण फोडणीच्या
तडका दिलेल्या आमटीच्या
आणी कधी कधी तर करपलेल्या भाताच्या देखील
फरक तसा काहीच नाही...
तिला तसाही विषय काही लागतच नाही...
सकाळी सार आटोपुन ऑफीसला पोहोचली
की तिला वेळच मिळत नाही कविता वगैरे करायला
मग संध्याकाळची घरी पोहोचली की
त्या संगीतकाराच्या प्रेमात ती ईतकी बुडुन जाते
की तिला वेळच मिळत नाही कविता वगैरे करायला
आणी मी कधी विचारल तर म्हणते...

आता "संसार" हीच कविता झालीये रे...
 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.