सलाम भारता सलाम तुला..
सलाम भारता सलाम तुला
भाग्यवान आम्ही देश असा लाभला
पंजाब असे लढवय्या भारी
बंगाली लेखनाची धार करारी
गोमांतक सौन्दर्याने नटला
भाग्यवान आम्ही देश असा लाभला
राजस्थानी ईतिहास गाजवी
महाराष्ट्र विजयी निशान फडकवी
गुजराती त्यागाने भारला
भाग्यवान आम्ही देश असा लाभला
हरियानाची दूधगंगा वाही
मैसूर रेशमी , दक्षिण देखणी
काश्मीर हिमालयाने सजला
भाग्यवान आम्ही देश असा लाभला
इथली माती इथली नाती
एकता ,बूढी ,धनधान्य ,समृद्धि
विश्वात सहिष्णुतेने गाजला
भाग्यवान आम्ही देश असा लाभला
सलाम भारता सलाम तुला
भाग्यवान आम्ही देश असा लाभला
No comments:
Post a Comment