तुम्ही माना अगर मानू नका.
तो तुम्हाला कोसतो आहे.
तुम्ही घ्या अगर घेउ नका.
तो तुम्हाला भर-भरून देत आहे.
तुम्ही बघा अगर बघू नका.
पण तुमच्या कर्माचे फळ तो भोगतो आहे.
तुम्ही द्या अगर देउ नका.
तुमचे शिव्या शाप तो सहन करत आहे.
तुम्ही ऐका अगर ऐकू नका.
निसर्ग तुमच्याशी बोलतो आहे, बोलतो आहे.
- आभार - कवि - लेखक
XXX
No comments:
Post a Comment