माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

आहे मीही...

आहे मीही ओढा साधा ओसरणारा!
वरवर केवळ अथांग सागर भासवणारा!

रोजच पडतो प्रश्न अताशा निजताना, का..
दूर राहिला हात मलाही जोजवणारा?

अजून मजला समजत नाही समोरचेही
जणू आंधळा हत्तीला मी चाचपणारा!

अबोल अश्रू म्हणजे निव्वळ खारट पाणी
आक्रोश हवा काळिज अवघे पिळवटणारा!

प्राणीमात्रांच्या हव्यासा अंत कोठला?
उडण्याचीही इच्छा धरतो सरपटणारा!

सांग वाटतो आज असा का हिरमुसलेला..
चेहरा तुझा चन्द्रालाही लाजवणारा?

लहरी राजा, स्वार्थी नेते, प्रजा आंधळी,
आणि कायदा...सत्यालाही भोसकणारा!

पुसे धुलीकण वाटेवरला हे वार्‍याला..
"कुठे थबकला पाय सारखा वणवणणारा?"

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.