मला आवडत ना ,
अंधारात जगायला,
डोळ्याटले पाणी ,
हळूच लपवायला.
थोडासा सावरल्यावर,
परत थोडे वादळात सापडावे.
नाहीच ओठांवर आले,
तर मग ,दुख आपले शब्दात मांडावे.
पसारा जरी तो,
पण हवा हावासा होता.
तुज़या आठवणीत जगण्याचा,
भास च निराळा होता.
सावरता सावरता तुटणे,
कधी करून पहा तू ही माज़या सारख.
राख राख ज़ालयावर,
थोडस जळून पहा त्या वाति सारख
न अवारणारा पसारा तो आठवणींचा
उथवितो मनात स्वप्नांचे गार वारे.
जसे ओलावल्या गवतान्वरि,
सजतात ते दव बिंदू हळूवार सारे.
तुज़ी आठवण येते,
मग हळूच पापण्या भीजतात.
माज़या भावना, मग
निशब्द होऊन कवितेत नीजतात.
No comments:
Post a Comment