जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती...!!!
अश्रूंचे झाले असते मोती,
काट्यान्ची झाली असती फुले,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या हृदयाची राणी झाली असती...
सुरानाही मीळाले असते नवे संगीत,
तीच्या नी माझ्या हृदयाची तार छेडली असती,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या स्वरांची रागीणी झाली असती...
डोळ्यांतून हृदयात उतरली असती प्रेमाची नशा,
जगन्यालाही मीळाली असती एक नवी दीशा,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या स्वप्नातली परी झाली असती...
प्रेमाची केली असती नवी काव्ये,
आकाशाचा कागद नी सागराची शाई केली असती,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या आयुष्याची कादंबरी झाली असती...
नको होते मग काहीही मला आयुष्याकडून,
जर तू माझी झाली असती...
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती.....!!!
--
कवि : प्रदिप
माझी भूमिका, माझा लढा!
ब्लोग वर शोधा
जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती...
Posted by
GSJ
on Wednesday, September 23, 2009
Labels:
Marathi kavita
No comments:
Post a Comment