माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

कळत - नकळत कस आयुष्य बनत....

कळत - नकळत कस आयुष्य बनत ,
जीवनाच गणित डोळ्यांसमोर उलगडत ,

आईची माया आठवताच मन भरून येत ,
खरच.. तिच्यासारख आपल्या कुणीही जवळच नसत ,

तिच्या सोबतीत जीवन स्वर्गापरी भासत ,
जस परिस लोखंडाला स्पर्श करत ,

शाळेत असताना मित्रांची सोबत असते ,
तिथे घडलेल्या सुख- दू:खाला त्यांच्या प्रेमाची झालर असते ,

त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा असतो ,
कारन त्या क्षणाला समजुतपनाचा ओलावा असतो ,

तरुनाईच्या उम्बरठ्यावर पाउल ठेवताच कस पंख आल्यासारख वाटत ,
अन उडताना आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हव असत ,

प्रियकराच्या सोबतीत हायस वाटत ,
अन त्याचा विरह जीवनात पडलेल विरझन वाटत ,

तरीही सर्व विसरून सुखाने सुरुवात कराविशी वाटते ,
कारन मागे पडलेल्या पाउलखुना अनुभवाची शिदोरी देते ,

एखाद्या सायंकाळी निवांतपणे हे सर्व आठवत ,
अन जीवनाच्या गणितात काय बाकी राहिल हे कळत -नकळत समजुन जात...

--
सुशांत

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.