हात असतात...
हात असतात वाट दाखवणारे
वाट चुकल्यावर थांबवणारे
बोट धरुन चालायला शिकवणारे
चालताना अड्खळल्यावर
आधारही देणारे
आशिर्वाद देणारे
आणि पाठही थोपटणारे
मदतीला धावणारे
आणि जीवही वाचवणारे
दान करणारे आणि उभारी देणारे
मायेने कुशीत घेणारे
मऊ भात भरवणारे
हातात हात घेऊन साथ करणारे
पण हाताहातांचही नशीब असतं बघा
म्हणुन तर काही हात लाचार असतात
सतत दुसऱ्या समोर पसरणारे
दया याचना करणारे
मेहनत करुनही भाकरीसाठी वळवळणारे
अशा हातांना हवा असतो एक खंबीर मदतीचा हात
तुमचा माझा कोणाचाही
फ़क्त एक आधार देणारा हात.
No comments:
Post a Comment