सये, तुझ्या रूपाने, चांदव्याला झिजवावे,
धुंद पावसाला तुझ्या, पापण्यांत भिजवावे |
सये, तुझ्या केसांत, मोगर्याला गुंतवावे,
तुझ्या सुवासात त्याने, सारे गंध विसरावे |
सये, तुझ्या डोळ्यांत, सागराला साठवावे,
त्याच्या किनार्याला तुझे, पैलतीर शोधवावे |
सये, तुझ्या ओठांनी, गुलाबाला चुंबवावे,
त्या साखरगोडीने त्याला, दिनरात झिंगवावे |
सये, तुझ्या गालांवर, दवबिंदू ओघळावे,
ते अमृत पिऊन मी, आयुष्य भागवावे |
No comments:
Post a Comment