हारलो प्रत्येक वेळी , डाव तरी ना मोडला
बोल , मी नशिबास माझ्या बोल केव्हा लावला ?
एकदा कधी चुकीने , भाग्य आले भेटण्या
बावरोनी मीच माझा चेहरा हा झाकला !
सोडुनी घर आपुले , ना कधी आलीस तु
रडुनी अनिकेत मी , संसार माझा मांडला !
यातनांची दीर्घ यात्रा , चालता थकलो जरी
ना तुझ्या दारात केव्हा मी विसावा याचिला !
हार माझी हार होती , मानिले मी लाखदा
मी तसा नव्हतो हुतात्मा , हारता जो जिंकला !
श्रीकांत चेंडके
माझी भूमिका, माझा लढा!
ब्लोग वर शोधा
हारलो प्रत्येक वेळी
Posted by
GSJ
on Thursday, September 24, 2009
Labels:
Marathi kavita,
मराठी कविता
No comments:
Post a Comment