खरखीत उन्हात
तू यायचीस झुळूक बनून
गारवा शिपत जायचीस
सप्तरंगाची बरसत व्हायची
गालाची लाली
नभाला गुलाबी करायची
सकळच्या किरणांसवे
पाण्याला सोनसळी झळाळी द्यायचीस
नेहमी वाटायचं
वाळवंटातही तू
हिरवाई बनून यायचीस
थकल्या सावल्यांसाठी
निळाई बनून यायचीस
राहवले नाही ग मला
तू रंगविभोरी
रंग वेचत गेलो
तुझ्या मागे धावलो
वाटले तू हरखून जाशील
तुझेच रंग पाहून
तू वळून पाहिलेस
हसण्यातून चांदणे उधळलेस
मात्र
मला कळून चुकले ग
रंगांचा तुझ्या नयनांना
उपयोग नव्ह्ता..
तू जन्मतःच रंगांधळी होतीस ..!!
No comments:
Post a Comment