माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

सांग कशाला आलास तू???

उजाड़ होते जीवन माझे,
किती परी ते छान होते,
होते माझी मीच एकटी,
सुख किती परी तयात होते,

नाही वाटली ओढ़ कुणाची,
जवळी नव्हते जरी कुणी,
नाही लाभले प्रेम कुणाचे,
नव्हती तयाची खंत मनी,

जीवनात परी तू माझ्या येता,
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला,
जीवनसाथी मानून तुजला,
गोफ नवा मी त्वरे गुंफला,

धागा परी मध्येच तोडून,
सोडून मजला गेलास तू,
जायचेच जर अखेर होते,
सांग कशाला आलास तू???

--
कवि : गीतांजली

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.