
आत्महत्या नाही स्व हत्या
ती तर आहे
आपल्यावर प्रेम करणार्यांना
फ़ाशीची शिक्षा
स्वतःला मारून
मुक्त आपण होऊन जातो
जाता जाता
आपल्यावर जीव लावणार्यांना
त्रास देऊन जातो
आयुष्यातील विवंचनांवर
आत्महत्या हाच का उपाय आहे ?
अहो प्रत्येकाला आपला भोग
आज ना उद्या
भोगायचा आहे
चला मिळून करुया
मनावर विजय
आत्महत्या न करता
करुया आयुष्य अजय
---मीनल
No comments:
Post a Comment