माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

चार ओळी तुज्यासाठी










मी व्यक्त होत राहिलो,
पण तुला कळलेच नाही.
शब्द माज़े,गीत ही माज़ेच होते,
मला नेमके गाणेच जमले नाही.




जरा शी रडली रूक्मिणी आज,
राधाने केली ही कसली मात होती..
जर रूक्मिणी होती दिव्य किरण एक,
तर राधा ही प्रकाश देणारी,एक वात होती.





मंदिरात बसून भजन करणारे,
काही सैतान मी पाहिले.
जोडुनि दग्डांसमोर हात,
आई वडिलाना सतावणारे मी पहिले.






त्यांच्यावर फूल वाहिलेले,
खरच दगडाणा आवडत न्हव्ते.
कारण फूलनाच वेचनारे होते इथे,
त्याना मात्र कुणीच सावडत न्हव्ते.





आज ती आसवे,
पापण्याना घाबरून गेली,
आलिस तू जवळ,
नि लगेच ती पाजरून गेली.





आस्वाना आस्वाणी ,
भिजवून आलो.
स्वप्नात माज़या ,
मलाच निजवून आलो.

पण अजूनही ,
शब्द जोड नाही जमत.
वादळ येऊनही,
मनाच पान नाही हलत.

माहीत होते त्रास होईल ,
तरीही ना अडवू शकलो.
तिला शोधता शोधता ,
स्वतालाच हरवून बसलो


शब्द नाही सुचले,
तुज़े वागणेच असे होते.
श्वास ही दूर पळे माजपसून ,
तुज़े टाळनेच असे होते .

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.