
भिंती,घर,नाते,
सुख, दुखांचे जाते..
घराला रंग पावसाच्या थेंबाचे
घराला कुंपण, तुझ्या नि माझ्या प्रेमाचे..
अंगण एक, अंगणात एक झाड,
छोटस बाळ, आईच्या पदरा आड,
एक वटवृक्षसर्वाना छाया देणारा..
एक वेल, सर्वाना जोडुन ठेवणारी…
एक रोपट ...वटवृक्षाच आणि वेलीच,
एक घर, माणुसकी आणि प्रेमाच,
हा हा हा भिंती,घर,नाते, सुख, दुखांचे जाते..
एक वादळ,
हिंदू-मुस्लिम अंतर.
एक गोळी…
एक .वटवृक्ष
आता एकटीच वेल…
आता एकटच रोपट….
घर तेच,
रंग तोच..
कुंपण तेच..
आता कुंपनात झाड कोठे?
जरी कोसळला वटवृक्ष ,
तरी वेल अजुनी लढते आहे…
रोपट आज ही सावालीत जगताय,
ती वेल उन्हात जळते आहे……..
हा हा हा भिंती,घर,नाते,
सुख, दुखांचे जाते.. ..
एक वटवृक्ष...???एक वेल....
!!!आणिएक रोपट ...
निशब्द(देव)
No comments:
Post a Comment