मातुनी उतुनी असे गेले..
टाकुनी अपुले वसे गेले!
हारले! परि शाहणे झाले!
जिंकुनी आता ससे गेले!
वाट होती योग्य कोणाची?
मी असा अन ते तसे गेले!
चोरले सर्वस्व मी त्याचे..
शेवटी पुसुनी ठसे गेले!
हीच आहे गोष्ट हर्षाची..
शील अद्यापी नसे गेले!
******सुधिर गोसावी******
No comments:
Post a Comment