...नकोशा रात्री !
टाळून कुठे टळतात नकोशा रात्री... ?
अंगावर कोसळतात नकोशा रात्री... !
दिसतात तशा या शांत जरी वरकरणी
आतूनच खळबळतात नकोशा रात्री !
बेहोष, सुगंधी, धुंद, हवीशी स्वप्ने...
वाऱ्यावर दरवळतात नकोशा रात्री !मी हाकलतो...पण लोचट जाती कोठे...?
दारातच घुटमळतात नकोशा रात्री !डोळ्यांत व्यथा दडवून कितीही ठेवा....!
...गालांवर ओघळतात नकोशा रात्री !आहेत जणू या पिंपळ आठवणींचे...
डोक्यावर सळसळतात नकोशा रात्री !यांच्यावरती उपचारच नाही आता -
जखमांसम भळभळतात नकोशा रात्री...!सोसून असे हे कुठवर सोसायाचे...?
निःशब्दच तळमळतात नकोशा रात्री !थांबेल कुठे ही आग...कशी अन् केव्हा...?
विझतात...पुन्हा जळतात नकोशा रात्री !कोलाहल वा गलका न, जराही दंगा...
मज शांतपणे छळतात नकोशा रात्री...!!
- प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment