माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

नाते

सारे बिघडल्यासारखे !
मोडून पडल्यासारखे !

ओठांवरी येई हसू -
आतून ऱडल्यासारखे !

दाही दिशा म्हणतात या -
`झाले जखडल्यासारखे !!`

सोडू नको गाणे़, जरी -
जगणे भरडल्यासारखे !


बघणे तुझे माझ्याकडे
चोरी पकडल्यासाऱखे !


का वाटले वळणावरी
पाऊल अडल्यासारखे !


आयुष्य संपू लागले...
वाया दवडल्यासारखे !


बरसायच्या आधीच का
वाटे उघडल्यासारखे ?


देहावरी या बंधने...
मनही मुरडल्यासारखे !


स्मित गूढ आहे का तुझे
अर्थात दडल्यासारखे !


वागून वागावे कसे...?
काही न घडल्यासाऱखे !


लिहिलेस माझे नाव तू
तेही घुसडल्यासारखे !


होऊन मी बोलू किती ?
माझेच नडल्यासारखे !


आठ्या कपाळी़... ओठही -
होते दुमडल्यासारखे !


माझे-तुझे नाते जणू
दुखणे रखडल्यासाऱखे !

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.