माझी भूमिका, माझा लढा!

ब्लोग वर शोधा

नकळत घडले सारे काही.......


नकळत घडले सारे काही, पडले अन प्रेमात तुझ्या ।
प्राण गुंतले, चित्त हरपले, मादक या नयनात तुझ्या॥
श्यामल वर्ण, सतेज कांती, मुख चंद्रमा चमचमता।
ताम्रसुरेची नशा अनोखी, लालस या ओठांत तुझ्या॥
कधी खुणेने जवळ बोलवी, अशी मूक देहभाषा।
कधी लज्जेने चूर करी, संकेत असा हास्यांत तुझ्या॥
कधी ओठांचे नाजुक चुंबन, कधी हलकीशी कमळमिठी।
कधी दिलाचा वेग वाढवी, आवेग असा बाहूंत तुझ्या
होती पूर्वी एक किशोरी, सुजाण, सक्षम अन मुक्ता ।
आज कोण ही प्रेमदिवाणी, कैद पुरी कैफात तुझ्या..................

No comments:

Post a Comment

 

ब्लॉग वर आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत...!!

******सुधिर गोसावी******

ग्रेट मराठी कविता... ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही. मी सुधिर गोसावी, ग्रेट मराठी कविता...मराठी मनाचा वेध घेण्यासाठी चालु केलेला एक प्रवास !! ब्लोगवर मराठी कवितेचे व साहित्याचे फक्त संग्रहण करतो, अधिकार गाजवत नाही.