दग्डांसमोर दर रोज़,
हात जोडायाचा मी,
खूप काही मागायचे,
निदुखांचाभार त्यावरच फोडायचा मी...
आनंदात कसला देव,
नि कसला विश्वास...
अडचणी आल्या की,
"देवा" बाबा आता तुझीच साथ...
चार आठण्याची फुले घेतो,
दुरुनच फेकून मारतो...
तुजसामोर नतमस्तक होताना,
भरपूर काही मागून घेतो....
तुझा आता बाजार मांडला आहे मी,
तुला काही देऊन काही मागायचे...
कणाकणात्त क्षणा क्षणात राम ,
क्षणा क्षणालाच त्याचे मुडदे पाडायचे..
मंगळवार या देवीचा...शनिवार त्या देवाचा..
कोण विद्वान सांगून गेले माहीत नाही..
5 दिवस मास मद्य चालवायचे...
देवाच्या नावाखाली मंगळवार आणि शनिवार..
याला भक्ति म्हणतात ,
कोण सांगून गेले माहीत नाही...
कुणाला मदत करायची,
आमची तयारी नाही..
दगडासमोर हात जोडायचे,
आईला सांभाळणे माझी जवाबदारी नाही..
कशाला ही नाटके..
माणुसकी नाही मनी..
मग कशाला उपवास...
देव माणसात आहे,दगडात नाही,
संगणार्या गाडगे महाराजानाच..दगड बनवून,
त्यांच्यासमोर हात जोडुन..
त्या महापुरुषाचा करतो मी अपमान...
कारण, मी माणूस आहे..
मी काहीही करू शकतो..
जिथे माझे नुकसान,तिथे मुडदे पाडू शकतो..
जिथे फायदा तिथे,गाढवालाही बाप बनवू शकतो..
No comments:
Post a Comment